International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 7, Issue 3 (May-June 2025) Submit your research before last 3 days of June to publish your research paper in the issue of May-June.

कृषी पर्यटन : कृषी उत्पन्नाची नवी दिशा

Author(s) Dr. Dinesh Yadavrao Parkhe
Country India
Abstract कृषी पर्यटन ही संकल्पना आजच्या काळात फार महत्वाची ठरत आहे. शहरी जीवनातील धावपळीतून आणि प्रदुषणातून काही वेळ विश्रांती मिळावी, यासाठी अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. ग्रामीण भागातील शेती आणि निसर्गरम्य स्थळाला भेट देण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. यातूनच कृषी पर्यटनाची संकल्पना उदयास आली. याचवेळी शेतकऱ्यासाठी त्यांच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याची गरज आहे या दोन्ही गरजांना एकत्र आणणारी संकल्पना म्हणजे “कृषी पर्यटन” होय.

कृषी पर्यटन म्हणजे काय?:
कृषी पर्यटन म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतावर किवा त्याच्या आसपासच्या परिसरात पर्यटकांना काही दिवसासाठी राहण्याची आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्याची संधी देणे. यात पर्यटकांना शेती, पशुपालन, स्थानिक संस्कृती आणि खाद्य पदार्थ याचा अनुभव घेता येतो.

आज जागतिकीकरणाच्या काळातही शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. देशातील जवळजवळ ५५ ते ६० टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पणे शेतीवर अवलंबून आहे तर देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाट घटत असला तरी त्याचे महत्व कमी झालेले नाही तसेच शेती व्यवसायात उत्पन्न वाढीचे जास्तीचे कार्यक्रम राबविले तर त्यामुळे देशाच्या उत्पन्नात शेताचा वाटा वध्य शकतो. त्यासाठी कृषी पर्यटन हा एक कार्यक्रम उपयुक्त ठरेल. पर्यटन हे रोजगार निर्मिती, दारिद्र्य निर्मूलन व शाश्वत विकासाचे महत्वाचे साधन मानले जाते. याशिवाय पर्यटनामुळे राष्ट्रीय एकात्मता, आंतरराष्ट्रीय तणाव, थानिक हस्तव्यवसाय व सांस्कृतिक कार्यक्रम यांना बळकटी मिळते. आतापर्यंत लाखो परदेशी पर्यटकांनी भारतातील पर्यटन स्थळाला भेटी दिल्या. यातून कोट्यावधी रुपयाचे परकीय चलन मिळत आहे. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, उत्पादन वाढ व विविधीकरण, सास्कृतिक सादरीकरण, कमी खर्चातील राहणीमान सुविधा, मानव संसाधन विकास, लोकांमध्ये जागृती व त्यांचा सहभाग वाढविणे. कृषी पर्यटनाला चालना देण्यामध्ये कृषी मंत्रालय, केंद्र व राज्य सरकार मधील पर्यटन विभागाचे संबधित अधिकारी, शेतकरी या सारखे काही महत्वाचे घटक आहेत. तसेच कृषी पर्यटनाच्या विकासासाठी ग्रामीण पर्यटन, जैविक पर्यटन, आरोग्य पर्यटन, साहस पर्यटन हे खेडे, शेती व शेतकरी यांना उत्पन्न प्राप्तीचा एक पूरक मार्ग उपलब्ध होवू शकतो. शेतकऱ्यांना त्यांच्या पिढीजात मालकीच्या शेती बरोबरच पर्यटकांना सोयीची व पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध असलेली अनेक स्थळे कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करता येईल.

१६ मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. कृषी पर्यटन हि संकल्पना मुळची ब्राझील, ऑस्त्रेलीया व न्यूझीलंड या देशामधील आहे. भारतासारख्या कृषी प्रधान देशात कृषी पर्यटन हि संकल्पना सध्या मोठ्या प्रमाणात रुजू लागली आहे. जागतिक पर्यटन आणि प्रवास परिषदेच्या (WTC) अहवालानुसार पर्यटन व्यवसायाने भारतात २२.३ दशलक्ष रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. भारतासारख्या कृषी प्रधान देशात या व्यवसायाला चांगला वाव आहे. कृषी पर्यटन विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पांडुरंग वावरे यांच्या कल्पक बुद्धीतून २००४ साली बारामती (पुणे) येथे साकारलेल्या पहिल्या धाडसी कृषी पर्यटन प्रकल्पातून महाराष्ट्रात कृषी पर्यटन व्यवसायाला सुरवात झाली. कृषी पर्यटनाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीने ऑगस्ट २००५ मध्ये कृषी पर्यटन आणि विकास संस्थेची (ATDC) स्थापना करण्यात आली. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून राष्ट्र विकासाला चालना मिळावी देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कृषी पर्यटन हे चांगले मध्यम आहे. अर्थातच हा कृषी पर्यटन व्यवसाय सर्वांच्या नजरेस आणून देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. महाराष्ट्रातील विविधतेने नटलेल्या पश्चिम महाराष्ट्र घाट माथा, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या विभागाची त्यांच्या नैसर्गिक, धार्मिक, सांस्कृतिक विविधतेमुळे देश विदेशात वेगळी ओळख आहे त्याची सखोल माहिती उपलब्ध व्हावी व दुसऱ्या बाजूला शेतकरी, शेती व्यवसाय आणि त्या भागातील लोकांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने अभ्यासकाने “कृषी पर्यटन: कृषी उत्पन्नाची नवी दिशा” या लेखाद्वारे प्रयत्न केला आहे.
Published In Conference / Special Issue (Volume 7 | Issue 3) - Two Day International Conference on Commerce & Economics (ICCE-2025) (May 2025)
Published On 2025-05-10

Share this