International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160   •   Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 5 (September-October 2026) Submit your research before last 3 days of October to publish your research paper in the issue of September-October.

शेती क्षेत्रातील अनुदाने आणि वित्त आयोगाच्या अहवालाचा आढावा

Author(s) Dr. Sunil Anna Gorde
Country India
Abstract कृषी क्षेत्राला दिले जाणारे अनुदान या संदर्भात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चर्चा होत असल्याची दिसते. राजकोषीय तूट आणि कृषी क्षेत्राला दिली जाणारी अनुदान यासंदर्भात विविध मते मांडली जातात. भारतामध्ये कृषी क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या संघ आणि राज्य कृषी अनुदानाचे जीडीपीशी असलेले प्रमाण लक्षणीय आहे. खत विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खताच्या किमती वरती अनुदान मिळते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत वेगवेगळ्या माध्यमातून कृषी क्षेत्राला अनुदान दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पकालीन कर्जाच्या व्याजदरात सवलत अनुदान मिळते, शेतकऱ्यांना पीक काढणीनंतर गोदामात ठेवलेल्या मालावर गोदाम पावती वरती अल्पकालीन कर्जावरील व्याजदरात दोन प्रतिशत अनुदान मिळते. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये जमीन, हवामान या नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीच्या मालमत्तेमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी बँकांनी दिलेल्या कर्जावरती दोन प्रतिशत व्याजदरात अनुदान मिळते. सदरील संशोधन पेपर मध्ये कृषी अनुदानाच्या संदर्भात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची रचना व खर्चाचे स्वरूप, कृषी अनुदाना संदर्भातील योजना, पंधराव्या वित्त आयोगाच्या अहवालातील कृषी अनुदानाच्या संदर्भातील आढावा, कृषी उपक्षेत्र त्यांना दिलेली अनुदान आणि उत्पादन वृद्धीतील संबंध, खत विभागाच्या अनुदानाचे स्वरूप, शेतीतील अनुदानाचा दुरुपयोग या प्रमुख घटकांचा आढावा घेतलेला आहे.
Published In Conference / Special Issue (Volume 7 | Issue 3) - Two Day International Conference on Commerce & Economics (ICCE-2025) (May 2025)
Published On 2025-05-10

Share this