International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 7, Issue 3 (May-June 2025) Submit your research before last 3 days of June to publish your research paper in the issue of May-June.

कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान

Author(s) Sharada Balasaheb Pawase
Country India
Abstract आज जगाच्या लोकसंख्येत फार मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या वाढत्या लोकसंख्येची महत्त्वाची गरज ही अन्नधान्य आहे. गेल्या ३५ वर्षात लोकसंख्येच्या तुलनेत अन्नधान्याची मागणी दुपटीपेक्षाही अधिक प्रमाणात वाढली आहे. अन्न व कृषी संघटनांच्या अहवालानुसार जागतिक लोकसंख्येपैकी १० टक्के लोक आजही कुपोषित आहे. या लोकांकडे निरोगी जीवन जगण्यासाठी पुरेसा प्रमाणात अन्न नाही. त्यामुळेच कृषी क्षेत्रात प्रगती होणे गरजेचे आहे. म्हणूनच कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानासाठी शासनाकडून भरीव अशी मदत देखील शेतकऱ्यांना केली जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पिकांचे उत्पादन वाढून शेतीच्या उत्पादकतेत वाढ झालेली आहे. जगाची वाढती लोकसंख्या आणि अन्नाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artifical Intelligence) तंत्रज्ञान दिवसेंदिवस अधिक प्रचलित होत आहे. सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणा वर बदल होत आहे. या बदलाचा शेतीवर विपरीत परिणाम होऊ नये. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे माहिती पुरविली जाते. आजच्या कालखंडात आधुनिक शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान खूप गरजेचे आहे. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी उपमुख्यमंत्र्यांनी गुगल सोबत करार केला. या अंतर्गत महाराष्ट्रातील कृषी, शैक्षणिक, आरोग्य विषयक माहिती या तंत्रज्ञानामुळे मिळण्यास सुलभ होणार आहे.
Published In Conference / Special Issue (Volume 7 | Issue 3) - Two Day International Conference on Commerce & Economics (ICCE-2025) (May 2025)
Published On 2025-05-10

Share this