International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 1 (January-February 2026) Submit your research before last 3 days of February to publish your research paper in the issue of January-February.

जलसंवर्धन, जलव्यवस्थापन आणि शाश्वत कृषी विकास

Author(s) Maldev Kamble
Country India
Abstract जगातील भौगोलिक प्रदेशात पावसाचे असमान वितरण आहे. ज्या भागात पावसाचे प्रमाण जास्त तेथे कृषी व्यवसाया बरोबरच अन्य व्यवसाय विकसित झाले आहेत. ज्या भागात अत्यल्प पर्जन्य आहे त्या भागात उपलब्ध पावसाच्या पाण्यावर प्रक्रिया करून व नवीन जलसिंचन पद्धतीचा वापर करून विविध व्यवसायात प्रगती साधत आहेत. आधुनिक.युगात वाढती लोकसंख्या, औद्योगीकरण, कृषी सिंचन, व घरगुती वापरासाठी भविष्यात मोठा प्रमाणात पाण्याची गरज वाढणार आहे. भूपृष्ठावरील जल साठ्यातील पाण्याचे साठवण क्षमता कमी झाली आहे. विविध गरजांसाठी मानव भूगर्भातील भूजल साठ्यातील पाण्याचा अमर्याद वापर करत आहे. अतिरिक्त भूजल उपसा होत असल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खूप खोल गेली आहे. अती खोलीवर भूजलामध्ये लोह, नायट्रेटस, भूगर्भातील क्षार, फ्लोराइड, फ्लोरीड, आर्सेनिक या रासायनिक पदार्थांमुळे भूजल प्रादुषित झाले आहे. आर्सेनिक मिश्रित पाण्यामुळे भारतातील 31 जिल्हे तर फ्लोराइड (Caf2) मिश्रित भूजलामुळे 184 जिल्हे प्रभावित झाले आहेत. यामुळे भूपृष्ठावरील निळ्या सोन्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
Published In Conference / Special Issue (Volume 7 | Issue 3) - Two Day International Conference on Commerce & Economics (ICCE-2025) (May 2025)
Published On 2025-05-10

Share this