International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 7, Issue 3 (May-June 2025) Submit your research before last 3 days of June to publish your research paper in the issue of May-June.

भारतातील शेतकरी आत्महत्या कारणे आणि उपाययोजना

Author(s) डॉ. विशाल शिवाजीराव करपे, डॉ. एल. एस. सिताफुले
Country India
Abstract कृषीप्रधान भारत देशात आजही शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतातील ६९ टक्के ग्रामीण भागात राहत असणाऱ्या लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती किंवा शेतमजुरी आहे. भारतात ०६ लाख पेक्षा अधिक खेडी आहेत. सुरुवातीच्या कालखंडापासूनच देशात रोजगार निर्मिती, राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा, भांडवल निर्मिती, परकीय चलन प्राप्ती, उद्योगांना कच्चामालाची उपलब्धता, चारा निर्मिती या विविध क्षेत्रात कृषी क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. त्यामुळेच शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजले जाते. भारतीय अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्थेच्या अवस्थेपर्यंत पोहोचविण्यामध्ये शेतीची योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. असे असले तरी आज कृषी क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झालेले आहेत त्यामुळे शेती व शेतकरी अडचणीत सापडले आहेत उत्पन्न व खर्चातील तफावत, उत्पादन खर्चात वाढ, सिंचनाचे अल्प प्रमाण, दारिद्र्यात वाढ, वाढते तुकडीकरण आणि अपखंडण, लागवड क्षेत्रात घट, अल्पभूधारक शेतकरी, कर्जबाजारीपणा, भांडवलाची कमतरता, निसर्गाचा लहरीपणा, विपणन व्यवस्थेतील दोष, व्यापारी व दलालांची मनमानी, विजेची टंचाई, हवामानातील बदल सरकारच्या धोरणातील बदल, जागतिकीकरण अशा विविध संकटात शेतकरी सापडलेला आहे. त्यामुळे शेतकरी जगण्याप्रती निरागस होऊन स्वतःचा आत्मविश्वास कमी झाला आहे. परिणामी तो विष प्राशन करून किंवा गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याचे विदारक चित्र संपूर्ण भारतात दिसत आहे. शेतकरी आत्महत्या हा प्रश्न भारतातच नाही तर तो अमेरिका, संयुक्त राष्ट्र, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, श्रीलंका या देशातही शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. या अनुषंगानेच सदरील संशोधन पेपर मध्ये भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयाचा अभ्यास करण्यात आलेला आहे.
Published In Conference / Special Issue (Volume 7 | Issue 3) - Two Day International Conference on Commerce & Economics (ICCE-2025) (May 2025)
Published On 2025-05-10

Share this