International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160   •   Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 5 (September-October 2026) Submit your research before last 3 days of October to publish your research paper in the issue of September-October.

विदर्भातील लेखिकांच्या कथांमधील विवाहसंस्थेविषयीचे स्वरूप व आकलन

Author(s) Unnati
Country India
Abstract भारतीय समाजात प्राचीन काळापासून वैवाहिक रूढी-परंपरा निश्चित केल्या गेले आहेत. येथील समाजव्यवस्था ही अनेक जाती,उपजातीनी बनलेली असली तरी त्या त्या जातीचे काही रीतिरिवाज सोडले तर हिंदू जीवनप्रणालीचा विवाहसंस्थेवर प्रभाव पडलेला दिसून येतो. विविध जाती समूहाच्या लोकांना आपापल्या सामाजिक रितीरिवाजानुसार कुटुंबातील मुला मुलींचे विवाह करणे सामाजिक दृष्ट्या बंधनकारक ठरविण्यात आलेले होते. समाजाच्या म्हणण्यानुसार कुटुंबाला तसे आचरण करूनच मुला मुलींना सामाजिक स्थान प्राप्त करून द्यायचे असते. म्हणून ते वैवाहिक रूढी परंपरेच्या विरोधात जात नाही. अलीकडे विवाहाच्या बाबतीत बरेच बदल घडून आले असले तरी,सामाजिक परंपरा व प्रथा मात्र अजूनही पाळल्या जातात. जातीबाहेर विवाह केले जात नाहीत.म्हणून तरुण तरुणी प्रेमविवाह करतात. तसेच लग्न न करता ते एकत्र राहण्याची एक ‘ लीव्ह अँड रिलेशनशिप’ अशी पद्धत प्रचलित होत गेलेली आहे. मात्र समाज त्याला मान्यता देऊ शकलेला नाही. अशा अनेक प्रकारची कथात्म मांडणी विदर्भातील लेखिकांनी त्यांच्या कथांमधून केलेली आहे. विशेषतः कुटुंब प्रमुख असलेला पुरुष मुलांच्या लग्नाचा निर्णय घेतो.त्याच्या विरुद्ध घरातील स्री काही बोलत नाही.त्यामुळे मुलींना तिच्या जगण्याचे व भविष्याचे स्वतः काहीच ठरविता येत नाही. वैवाहिक रूढी परंपरेनुसार मुलीला कनिष्ठ व दुय्यम स्थान दिले जात असल्याने तिच्या कुटुंबाला नमते घ्यावे लागते असेही या लेखिकांनी त्यांच्या कथांमधून स्पष्ट केलेले आहे.
Keywords लेखिका कथा विवाहसंस्था
Field Arts
Published In Volume 7, Issue 1, January-February 2025
Published On 2025-02-07
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2025.v07i01.36586

Share this