International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 2 (March-April 2026) Submit your research before last 3 days of April to publish your research paper in the issue of March-April.

क्षेत्रीय आणि सांस्कृतिक समन्वयाची उत्तम उदाहरणे- कथक नृत्य आणि वारकरी कीर्तन परंपरा

Author(s) वृषाली दाबके, डॉ. मंजिरी देव
Country India
Abstract उत्तर भारतातील आक्रमणे आणि बदलांना सामोरे जाऊन मंदिर, दरबार, समाज, रंगमंच असा प्रवास करत विकसित झालेले कथक नृत्य हे मंदिर परंपरा, दरबार परंपरा तसेच हिंदू संस्कृती आणि मोघल संस्कृतीच्या समन्वयाचे उत्तम उदाहरण आहे हे सिद्ध करण्याकरिता; तसेच ज्याप्रमाणे मोघल आक्रमणाविरुद्ध उत्तर भारतात भक्ती आंदोलनाची सुरुवात झाली, संतांनी भक्तीकाव्यांची रचना केली, जी कथक नृत्याचाही आधार बनली; त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील संत नामदेव, संत तुकाराम यांनी देखील समाजप्रबोधनात्मक अनेक रचना केल्या ज्या वारकरी कीर्तनाच्या अविभाज्य भाग बनल्या. या काव्यरचना सर्वसमावेशक होत्या आणि सर्वधर्मसमभाव या विचारास चालना देणाऱ्या होत्या हे सिद्ध करण्याकरिता हा शोध निबंध लिहिण्यात आला आहे. 'वसुधैव कुटुम्बकम' म्हणजेच संपूर्ण विश्व हा एक परिवार आहे, हे विश्व म्हणजे विविधतेत एकता नसून एकात्म विविधता आहे, म्हणजेच आपण एक असून आपल्या जीवन पद्धतीत विविध रंग आहेत हा भाव आज जगभर निर्माण करण्याची गरज आहे. तीव्र वेगाने विकसित होत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण एक परिवार आहोत या ऐवजी आधुनिक समाज स्वतंत्र अस्तित्वाला अधिक प्राधान्य देत आहे. अशा वातावरणात समभाव आणि माणुसकीच्या प्रेमळ धाग्यात विश्वाला बांधून ठेवण्याच्या दृष्टीने शास्त्रीय आणि लोकनृत्य यातील सर्वसमावेशकता, क्षेत्रीय आणि सांस्कृतिक समन्वय समाजासमोर आणणे आवश्यक आहे. कथक नृत्य ज्याचा आज जगभर प्रचार- प्रसार झाला आहे, ते निव्वळ अंग संचलन, पदन्यास, चक्कर या तत्त्वामुळे नसून त्यातील प्रस्तुती, कथा, भाषा, तांत्रिक शब्दावली, काव्यरचना यातील वैविध्यामुळे. तसेच पंढरपूरची वारी,रिंगणातील खेळ, वारकरी कीर्तनाची प्रस्तुती तर वसुधैव कुटुंबकांचे मूर्तीमंत उदाहरण आहे. वारीमधील पावलं आणि खेळ यात हजारोंनी उपस्थित वारकरी जे हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन अशा स्वतंत्र धर्माचे अस्तित्व न ठेवता निव्वळ 'वारकरी' या भावनेने विठ्ठल भक्तीत सामील होतात. एक सूर, एक ताल, एक लय, एक भाव, भक्ती भाव असलेल्या वारीच्या नृत्याचे आकर्षण जगातील सर्व देशांना आहे. पंढरपूरच्या वारीतील हे नृत्य सर्वसमावेशकतेचे आणि वसुदेव कुटुंबकम या भावनेचेच प्रतीक आहे. त्याची ओळख नव्या पिढीला करून देऊन योग्य विचारांचा मार्ग दाखवण्याची गरज आहे आणि त्याकरिता हा शोध निबंध उपयुक्त ठरेल. कथक आणि वारकरी कीर्तनाच्या साहित्यातील सर्व समावेशक तत्व शोधणे आणि दोन्ही शैलीच्या जगभर झालेल्या प्रचार प्रसाराचा आढावा घेणे ही या शोधनिबंधाची उद्दिष्टे आहेत. कथक नृत्यातील वस्तूक्रमात मंदिर परंपरेची तत्वे जशी कथा आख्यान, हिंदू दरबारातील तत्त्वे म्हणजे रंगमंच प्रणाम, गतभाव, भजन, अभंग, पौराणिक कथा यावर प्रस्तुती करणे, तसेच मोगल दरबारातील सलामी, सलामी के तुकडे गझल, शृंगारिक ठुमरी ,गतनिकास यांना देखील प्राधान्य असणे, भावपक्षात कजरी, चैती ,झुलासारख्या रचनेत ब्रज , अवधी भाषेसहित ताल अंगात आमद, सलामी सारखे फारसी आणि उर्दू भाषेचा प्रभाव असणे; भजन, अभंगांमध्ये उत्तर भारतीय संतकाव्यासहित महाराष्ट्र संत काव्यांचाही ही समावेश असणे आणि मंदिर परंपरेप्रमाणेच संस्कृत भाषेतील श्लोक, स्तोत्र यांचा वंदना, स्तुती म्हणून उपयोग करणे; हे सर्व मुद्दे शोधनिबंधाच्या विषयास योग्य ठरवितात. तसेच संत नामदेव यांच्या मराठी सहित हिंदी आणि उर्दू भाषेतील रचना, संत तुकारामांनी हिंदू, क्रिश्चन आणि इस्लाम सर्व जनसमुदायाकरीता रचलेली अनेक काव्ये सर्वधर्मसमभावाच्या माध्यमातून वसुधैव कुटुंबकम या भावनेलाच चालना देतात.या संशोधनात प्राप्त पुरावे कथक आणि वारकरी परंपरांचा विकास जगासमोर क्षेत्रीय आणि सांस्कृतिक समन्वयाचे उदाहरण म्हणून सिद्ध करतात.
Keywords कथक, वारकरी, आमद, कजरी, वस्तुक्रम
Published In Volume 7, Issue 5, September-October 2025
Published On 2025-09-21
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2025.v07i05.55878

Share this