International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 2 (March-April 2026) Submit your research before last 3 days of April to publish your research paper in the issue of March-April.

राज्यस्तरीय १७ वर्षाखालील बेसबॉल स्पर्धेतील यशस्वी व अयशस्वी खेळाडूंच्या स्वकार्यक्षमतेचा तुलनात्मक अभ्यास

Author(s) Mr. LAXMAN TUKARAM GAWADE, Dr. ABHIJEET BABANRAO KADAM
Country India
Abstract सदर संशोधनाचा हेतु हा राज्यस्तरीय १७ वर्षाखालील बेसबॉल स्पर्धेतील यशस्वी व अयशस्वी खेळाडूंच्या स्वकार्यक्षमतेचा तुलनात्मक अभ्यास करणे असा होता. यासाठी वर्णनात्मक तुलनात्मक पद्धतीचा वापर करून यासाठी २०२४-२५ साली झालेल्या राज्यस्तरीय १७ वर्षाखालील बेसबॉल स्पर्धेतील ६४ यशस्वी बेसबॉल खेळाडूंची व ६४ अयशस्वी बेसबॉल खेळाडू अशा एकूण १२८ खेळाडूंची सहेतुक पद्धतीने निवड करण्यात आली. यशस्वी व अयशस्वी खेळाडूंच्या स्वकार्यक्षमतेचे मापन करण्यासाठी कोकाक,सी.व्ही (२०२०) यांची अॅथलीट सेल्फ एफिकसी स्केल या प्रश्नावलीद्वारे माहिती संकलित केली गेली.या प्रश्नावालीमध्ये एकूण १६ प्रश्न ५ पॉइंट लिकर्ट स्केल या तत्वावर बनवले होते.प्रश्नावलीद्वारे प्राप्त माहितीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी वर्णनात्मक सांख्यिकीमधील मध्यमान, प्रमाण विचलन, आणि मध्यमानातील प्रामाणिक त्रुटी तसेच अनुमानात्मक सांख्यिकीय विश्लेषण करण्यासाठी “स्वतंत्र टी-परीक्षका” चाचणीचा अवलंब करण्यात आला. यशस्वी बेसबॉल खेळाडूंच्या कार्यमानाचे मध्यमान ५६.१६ एवढे तसेच प्रमान विचलन १०.६८ एवढे आले व मध्यमानातील प्रमाणित त्रटुी १.३३५ एवढे आहे. त्याचप्रमाणे अयशस्वी बेसबॉल खेळाडूंच्या कार्यमानाचे मध्यमान ५८.३० एवढे तसेच प्रमान विचलन ५.०७ एवढे आले व मध्यमानातील प्रमाणित त्रटुी .६२६ एवढे दिसून आले. यशस्वी व अयशस्वी खेळाडूंच्या स्वकार्यक्षमतेची तुलना स्वतंत्र टी-परीक्षका चाचणीद्वारे केली असता मध्यमानातील फरक -२.१४१ एवढा आला. प्राप्त टी मूल्य -१.४५२ एवढे असून ८९.४२ या स्वाधीनता मात्रेसाठी ०.०५ सार्थकता स्तरावर सार्थक फरक दर्शवत नाही. (p= .१५०)आलेल्या निष्कर्षानुसार राज्यस्तरीय १७ वर्षाखालील बेसबॉल स्पर्धेतील यशस्वी व अयशस्वी खेळाडूंच्या स्वकार्यक्षमतेमध्ये सार्थक फरक आढळून आला नाही.
Keywords राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धा , यशस्वी खेळाडू, अयशस्वी खेळाडू, स्वकार्यक्षमता.
Published In Volume 7, Issue 5, September-October 2025
Published On 2025-09-26
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2025.v07i05.56331

Share this