International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 1 (January-February 2026) Submit your research before last 3 days of February to publish your research paper in the issue of January-February.

पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील किशोरवयीन शालेय विद्यार्थ्यांचा शारीरिक शिक्षणाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा तुलनात्मक अभ्यास

Author(s) Mr. MAHENDRA NAMDEV DATE, Dr. ABHIJEET BABANRAV KADAM
Country India
Abstract सदर संशोधनामध्ये पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील किशोरवयीन शालेय विद्यार्थ्यांचा शारीरिक शिक्षणाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी वर्णनात्मक तुलनात्मक पध्दतीचा वापर करण्यात आला आहे. सदर संशोधनामध्येपुणे जिल्यातील शहरी भागातील दोन शाळा व ग्रामीण भागातील दोन शाळा अशा चार शाळांची निवड सोयीस्कर पद्धतीने करण्यात आली . पुणे जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील एकूण चार शाळांमधील २६८ किशोरवयीन शालेय विद्यार्थ्यांपैकी १६० विद्यार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. तेजश्री सुरेश फडतरे यांनी एप्रिल २०१३ मध्ये निर्मित बंदिस्त प्रश्नावलीचा वापर केला आहे. प्रश्नावलीमधील २० प्रश्न ५ पॉईट लिकर्ट स्केल अशा तत्वानूसार बनविले होते. त्यातील सर्व गुणांकन कमीत कमी २० ते जास्तीत जास्त १०० या रेंजमध्ये करून जितके जास्त गुणांकन तितका सकारात्मक दृष्टीकोन असे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीचे संख्याशास्त्रीय विश्लेपण करण्यासाठी वर्णनात्मक सांख्यिकीय विश्लेषण केले असता शहरी व ग्रामीण भागाचे मध्यमान अनुक्रमे ८४.१० व ७६.५४, प्रमाण विचलन अनुक्रमे ५.३७ व ८.९१ आणि मध्यमानातील प्रमाणित त्रुटी अनुक्रमे ०.६० व ०.९१ असे आले. अनुमानात्मक सांख्यिकीय विश्लेषण करण्यासाठी स्वतंत्र टी परिक्षिकेचा अवलंब केला असता दोन्ही गटाच्या विचलनातील समानता शोधण्यासाठी विचलनाच्या समानतेसाठीची लेव्हिन’स चाचणी काढण्यात आली. प्राप्त एफ मूल्य = १२.०५ इतके व सार्थकता मूल्य ०.००१ इतके आले जे ०.०५ पेक्षा कमी आहे म्हणून समान विचलन गृहीत धरण्यात आले नाही. दोन्ही गटाच्या मध्यमानाची तुलना केली असता मध्यमानातील फरक ७.५६, प्राप्त टी मुल्य ६.९० इतके असून १३६.३४ या स्वाधिनता मात्रेसाठी ०.०५ सार्थकता स्तरावर सार्थक फरक दिसून येतो. (p = ०.००१)
Keywords शारीरिक शिक्षण, शारीरिक शिक्षणाकडे बघण्याच्या दृष्टिकोन, ग्रामीण, शहरी, शालेय विद्यार्थी
Published In Volume 7, Issue 5, September-October 2025
Published On 2025-09-26
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2025.v07i05.56388
Short DOI https://doi.org/g946d5

Share this