International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 2 (March-April 2026) Submit your research before last 3 days of April to publish your research paper in the issue of March-April.

सौर कृषी पंप : ऊर्जा अपव्ययातून ऊर्जा संजीवनीकडे

Author(s) Arjit Amol More
Country India
Abstract भारताच्या कृषिप्रधान अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांसाठी नियमित वीजपुरवठा हा एक गंभीर प्रश्न आहे. महाराष्ट्रातील ४५ लाखांहून अधिक कृषी ग्राहकांना चक्राकार पद्धतीने दिवस-रात्र वीजपुरवठा होत असल्यामुळे रात्री सिंचन करावे लागते. यामुळे अपरात्री अपघात होण्याची शक्यता वाढते तसेच उत्पादनक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. या समस्येवर उपाय म्हणून राज्य शासनाने “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” आणि केंद्र शासनाने “प्रधानमंत्री कुसुम योजना” सुरू केली. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सौर ऊर्जेद्वारे वीज उपलब्ध होऊन सिंचन सुलभ झाले. मात्र, प्रत्यक्षात सौर कृषी पंपातून निर्माण होणारी DC वीज दिवसातून फक्त ३-५ तास वापरली जाते, तर उर्वरित वेळेत निर्माण होणारी वीज वाया जाते. या वाया जाणाऱ्या उर्जेचा कार्यक्षम वापर करण्यासाठी विविध पर्यायांचा अभ्यास करणे आणि DC ते AC रूपांतरण प्रणाली विकसित करणे हा या संशोधनाचा मुख्य हेतू आहे. या अनुषंगाने मी बुलढाणा, वाशीम आणि हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या गरजा जाणून घेतल्या. या संवादातून स्पष्ट झाले की अतिरिक्त उर्जेचा उपयोग घरगुती व पूरक उद्योगांसाठी (धान्य मळणी, आटाचक्की, दुग्धशाळा, कोल्ड स्टोरेज, ई-वाहन चार्जिंग इ.) होऊ शकतो. प्रस्तावित सार्वत्रिक सौर पंप नियंत्रक (Universal Solar Pump Controller - USPC) प्रणाली ही DC ऊर्जा AC मध्ये रूपांतरित करून या सर्व उपक्रमांना ऊर्जा उपलब्ध करून देतो. या प्रणालीमुळे वाया जाणारी ६०-७०% ऊर्जा उपयुक्त ठरते. परिणामी शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतात, ग्रामीण भागाला दिवसभर वीज उपलब्ध होते, रोजगारनिर्मिती वाढते आणि शासनावरील आर्थिक भार कमी होतो. तसेच, ई-वाहन चार्जिंगची सोय केल्यास ग्रामीण भाग हरित वाहतुकीसाठी सज्ज होऊ शकतो. पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही हा उपक्रम महत्त्वाचा आहे, कारण कोळसा व डिझेलवरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जन घटण्यास मदत होईल. सारांशतः, सौर कृषी पंपातून निर्माण होणाऱ्या उर्जेचा बहुउद्देशीय वापर केल्यास सौर उर्जेचा कार्यक्षम वापर, शाश्वत ग्रामीण विकास, ऊर्जा स्वावलंबन व शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढ ही उद्दिष्टे साध्य होतात. तसेच ऊर्जा अपव्ययातून ऊर्जा संजीवनीकडे वाटचाल करणारे महाराष्ट्राचे हे मॉडेल इतर राज्यांसाठी आणि विकसनशील देशांसाठी अनुकरणीय ठरू शकते.
Keywords सौर कृषी पंप, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, ऊर्जा कार्यक्षमतेचा वापर, ग्रामीण ऊर्जा स्वावलंबन, युनिव्हर्सल सोलार पंप कंट्रोलर, USPC, शाश्वत ग्रामीण विकास
Field Physics > Energy
Published In Volume 7, Issue 6, November-December 2025
Published On 2025-12-08
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2025.v07i06.63150

Share this