International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 2 (March-April 2026) Submit your research before last 3 days of April to publish your research paper in the issue of March-April.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा साहित्यविचार

Author(s) Dr. Vijay Hariram Raiwatkar
Country India
Abstract राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील संतपरंपरेतील एक प्रभावी संतकवी, समाजसुधारक आहेत. त्यांच्या साहित्याचा मुख्य उद्देश समाजजागृती, नैतिक मूल्यांची स्थापना आणि राष्ट्रनिर्मिती हा होता. त्यांचे साहित्य केवळ आध्यात्मिक चिंतनापुरते मर्यादित राहिले नाही; तर ते सामाजिक परिवर्तनाचे प्रमुख साधन बनले. त्यांनी त्यांच्या अभंगांतून समाजाला मानवविकासाची परिवर्तनशील अशी दृष्टी प्रदान केली आहे. त्यांनी विपुल लेखन केले. त्यात भजन, ओव्या, पोवाडे, श्लोक, आरत्या, त्यांची भाषणे अशा विविधप्रकारच्या साहित्याचा समावेश आहे. त्यांच्या साहित्यलेखनाची साहित्यविचारदृष्ट्या चिकित्सा केली असता त्यांची कलाविषयक आणि साहित्यविषयक असणारी भूमिका लक्षात येते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या लेखनातील साहित्यविचाराचा परामर्श घेता असे लक्षात येते की, साहित्य हे भक्तिसाहित्यापुरते मर्यादित असता कामा नये. साहित्याने सामाजिक, राष्ट्रीय आणि नैतिक पुनरुत्थानाच्या विचारांची दिशा प्रदान करावी, अशी त्यांची प्रमुख भूमिका आहे. ही त्यांची भूमिका साहित्याच्या निर्मिती आणि प्रयोजनामागेदेखील आहे. त्यांच्या साहित्यविचारात आध्यात्मिक साधना आणि व्यावहारिक जीवन यांचा सुंदर संगम दिसतो. साहित्यनिर्मितीतून समाजहीत साधले जावे. साहित्यातून मानवी मूल्ये प्रस्तुत होतील अशा आशयाचे लेखन व्हावे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्पष्ट करतात. साहित्य हे समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे माध्यम व्हावे. कलाकाराने त्याच्या कलेद्वारे समाजजागृती व प्रबोधनाचे कार्य करावे, हे त्यांच्या साहित्यविचाराचे प्रमुख सूत्र राहिले आहे.
Keywords संत, साहित्य, समाज, कला, प्रबोधन, विदर्भ
Field Arts
Published In Volume 8, Issue 1, January-February 2026
Published On 2026-02-27

Share this