International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160   •   Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 5 (September-October 2026) Submit your research before last 3 days of October to publish your research paper in the issue of September-October.

मराठी कादंबरी ते चित्रपट माध्यमांतर: पटकथा लेखनातील आव्हाने आणि रणनीती

Author(s) Ms. सुरेखा बाबुराव नागरे, Prof. Dr. पौर्णिमा शिवाजी बोडके
Country India
Abstract गोषवारा:
मराठी कादंबऱ्या आपल्या विस्तृत आणि सखोल वर्णनाने, मानवी भावनांनी आणि समाजातील खऱ्या चित्रणाने वाचकांना खूप आपलेसे करतात. पण जेव्हा या कादंबऱ्या चित्रपटात माध्यमांतरित होतात, तेव्हा पटकथालेखन करणे ही प्रक्रिया सर्वात गुंतागुंतीची, कठीण आणि सर्जनशील काम ठरते. मराठी कादंबऱ्यांचे चित्रपट माध्यमांतर ही एक सर्जनशील, बहुपर्यायी आणि तांत्रिक प्रक्रिया आहे. कादंबरी आणि चित्रपट या दोन माध्यमांतील अभिव्यक्तीतील मूलभूत फरक लक्षात घेतल्यास, या रूपांतर प्रक्रियेत पटकथा लेखन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. कादंबरीत लेखक शब्दांनी वाचकांच्या मनात चित्र उभे करतो, पण चित्रपटात हे सर्व फक्त दोन ते अडीच तासात दाखवावे लागते. पात्रांच्या मनातील भावना, लांबलचक वर्णने, सूक्ष्म बदल आणि सामाजिक अनुषंगाने होणारे बदल यांना दृश्य भाषेत, संवादात आणि मौनात कसे बसवायचे, असा प्रश्न उभा राहतो.

या लेखामध्ये मी तीन प्रसिद्ध मराठी कादंबऱ्यांच्या चित्रपट रूपांतराचा अभ्यास केला आहे, ज्यामध्ये ‘शाळा’ (मिलिंद बोकील), ‘७२ मैल एक प्रवास’ (अशोक व्हटकर), आणि ‘जैत रे जैत’ (गो. नी. दांडेकर) यांचा समावेश आहे. या प्रत्येक कादंबरीतून पटकथाकारांना कोणत्या अडचणी आल्या, कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी कोणत्या रणनीती वापरल्या गेल्या, हे सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

या लेखातून विद्यार्थ्यांना आणि पटकथालेखकांना कादंबरी आणि चित्रपट रूपांतरातील आव्हाने आणि उपाय यांची चांगली कल्पना येईल. हा अभ्यास पटकथाकार, दिग्दर्शक, संशोधक आणि मराठी साहित्य-चित्रपट प्रेमींसाठी उपयुक्त ठरेल.
Keywords कीवर्ड्स: माध्यमांतर, मराठी कादंबरी, पटकथा लेखन, चित्रपट रूपांतर, आव्हाने, रणनीती, दृकश्राव्य, पुनर्निर्मिती
Field Arts
Published In Volume 8, Issue 4, July-August 2026
Published On 2026-07-02
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2026.v08i04.82816

Share this