International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160   •   Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 5 (September-October 2026) Submit your research before last 3 days of October to publish your research paper in the issue of September-October.

राजकीय जागृती निर्माण करण्यात समाजमाध्यमांची भूमिका

Author(s) Dr. Chaturdas Janba Telang
Country India
Abstract सारांश
लोकशाही व्यवस्थेच्या यशासाठी नागरिकांची राजकीय जागृती अत्यंत महत्त्वाची आहे. संविधान नागरिकांचे अधिकार व कर्तव्य निवडणूक प्रक्रिया राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या धोरणांची माहिती असणे म्हणजे राजकीय जागृती होय. आज फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, यूट्यूब, टेलिग्राम या सारख्या समाजमाध्यमांमुळे राजकीय माहिती नागरिकांपर्यंत वेगाने आणि व्यापक प्रमाणात पोहोचते. विशेष तरुणांमध्ये राजकीय माहिती मतदानाचे महत्त्व आणि सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमे प्रभावी ठरतात.
समाजमाध्यमांमुळे नागरिकांना आपली मते व्यक्त करता येतात शासन व लोकप्रतिनिधींशी संवाद साधता येतो आणि सामाजिक व राजकीय प्रश्नांवर जनमत तयार करता येते. निवडणूक आयोगासारख्या संस्थाही मतदार जागृतीसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करतात. मात्र खोटी माहिती, अफवा, द्वेषपूर्ण मजकूर, दिशाभूल करणारे प्रचार आणि AI निर्मित सामग्री या मुळे धोके ही निर्माण होतात. त्यामुळे माहितीचा स्रोत तपासणे अधिकृत माहितीला प्राधान्य देणे आणि विविध मतांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे आवश्यक आहे. अशा जबाबदार वापरामुळे समाजमाध्यमे राजकीय प्रचाराचे साधन न राहता लोकशाही शिक्षण जनमतनिर्मिती आणि सक्रिय नागरिकत्वाचे प्रभावी माध्यम बनू शकतात.
Keywords लोकशाही, राजकीय जागृती, समाजमाध्यमे, जनमतनिर्मिती, मतदार जागृती, डिजिटल साक्षरता, राजकीय शिक्षण,
Field Arts
Published In Volume 8, Issue 4, July-August 2026
Published On 2026-08-28

Share this