International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 3 (May-June 2026) Submit your research before last 3 days of June to publish your research paper in the issue of May-June.

विदर्भातील लोकनाट्य दंडार

Author(s) Prof. Dr. Vijay Hariram Raiwatkar
Country India
Abstract महाराष्ट्रातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली व भंडारा या जिल्ह्यातील झाडीपट्टी मातीत मुरलेला, जनसामान्यांच्या अंगात भिनलेला संपूर्ण झाडीपट्टीत लोकप्रिय असलेले लोकनाट्य दंडार होय. दंडार या लोकनाट्याने फार पूर्वीपासून आपली लोकरंजनाची व लोकोद्बोधनाची परंपरा कायम राखली आहे. दंडार लोकनाट्य हे झाडीपट्टी परिसराचे सांस्कृतिक भूषण आहे. आधुनिक काळात प्रसार माध्यमांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असला. चित्रपट, टी. व्ही., मोबाईल आदी आधुनिक साधनांमुळे जनजागृती व मनोरंजन होत असले तरी प्राचीन काळापासून लोकरंजन करणाऱ्या दंडारीसारख्या लोकनाट्याचे महत्त्व आजही कमी झाले नाही हे विशेष. दिवाळी नंतरच्या काळात मंडई निमित्त गावागावात आजही दंडार आयोजित केली जाते व ग्रामीण समाजमन दंडार या लोकनाट्याचा आनंद मोठ्या रसिकतेने घेताना दिसतो. ग्रामीण भागात लोककलेचा प्रकार म्हणून दंडारीस आजही महत्त्व आहे. विदर्भाच्या मातीत मुरलेली अस्सल लोककला म्हणून दंडार या लोकनाट्याकडे पाहावे लागते. आज वर्तमानात त्या त्या प्रदेशातील विविध लोककलांपुढे बदलत्या व गतिशील काळाची आव्हाने असली तरी लोकसांस्कृतिक जीवनातील मूल्यात्मता टिकवून ठेवण्यासाठी, निखळ लोकरंजनासाठी व उद्बोधनासाठी लोककलांचे संवर्धन होण्याची गरज आहे त्याशिवाय येणाऱ्या पिढ्यांना सामाजिक-सांस्कृतिक लोकजीवनातील सौंदर्य अनुभवताच येणार नाही
Keywords विदर्भ, दंडार, झाडीपट्टी
Field Arts
Published In Volume 7, Issue 6, November-December 2025
Published On 2025-11-22
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2025.v07i06.61334

Share this