International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 3 (May-June 2026) Submit your research before last 3 days of June to publish your research paper in the issue of May-June.

शासकीय योजनेतून महिला शेतमजुरांचे सक्षमीकरण

Author(s) Ms. PRANALI JAGDISH SHENDE, Dr. PRITI P PATIL
Country India
Abstract भारतीय अर्थव्यवस्थेचा ‘कणा’ म्हणून कृषी (शेती) क्षेत्राकडे बघितले जाते आणि याच कृषी क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजेच ‘शेतमजूर’ हा होय. ‘शेती, शेतकरी आणि शेतमजूर’ या तीनही घटकाचा फार जवळचा संबंध आहे कारण हे तीनही घटक एकमेकांना परस्परपूरक आहे. शेती उत्पादनात ‘महिला शेतमजुरांचा’ फार मोलाचा वाटा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशाच एका घटकातील म्हणजेच कृषी क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून ‘महिला शेतमजूर’ यांचा समावेश होतो. शेतातील बरीचशी कामे जसे नांगरणे, कुळपणे, पेरणी करणे, कापणे, पिकांना खाते देणे अशी विविध कामे महिला शेतमजूर करताना दिसतात.
आजही बऱ्याचशा महिला कौटुंबिक जबाबदारी सांभाळून शेतावर कामाला जाताना दिसतात. सामाजिक आर्थिक अशा अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांमध्ये कमी मजुरी (वेतन), कामाची अनिश्चितता, शिक्षणाचा अभाव, कर्जबाजारीपणा तसेच पिळून यांचा समावेश होतो. अशा विविध समस्येच्या निराकरणासाठी महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय दृष्ट्या सक्षम बनविणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने विविध योजना अमलात आणून महिला सक्षमीकरणासाठी सुरुवात केली. बचत गट, उज्वला योजना, मनोधैर्य योजना, माझी लाडकी बहिणी इत्यादी सारख्या विविध योजनांमार्फत महिलांच्चे सक्षमीकरण करण्यात येत आहे. महिला शेतमजूरांच्या विविध समस्या जाणून घेणे व शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने प्रस्तुत शोधनिबंध, ‘शासकीय योजनेतून महिला शेतमजुरांची सक्षमीकरण’ यावर लिखाण करण्यात आलेले आहे.
Keywords महिला शेतमजूर, समस्या, सक्षमीकरण, उपाययोजना, शासकीय योजना
Field Sociology
Published In Volume 8, Issue 1, January-February 2026
Published On 2026-01-11
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2026.v08i01.66283

Share this