International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 2 (March-April 2026) Submit your research before last 3 days of April to publish your research paper in the issue of March-April.

लोकसाहित्य संकल्पना व स्वरूप:

Author(s) Dr. Vijaya Pandurang Patil
Country India
Abstract भारतीय संस्कृती प्राचीन व प्रगल्भ आहे. वेगवेगळ्या प्रांतात लोकप्रथा आणि वैदिक संस्कृती याच्यातील बदल, मानव आणि सभोवताल यांचे दर्शन लोकसाहित्यातून घडते. लोकसाहित्याचा अभ्यास करताना लोकसाहित्य मानवी मन, समाज व्यवहार, सांस्कृतिक परंपराचे जतन करते. यामुळे लोकसाहित्याला साहित्यिक गुणविशेषता लाभलेली दिसते. लोकसाहित्यातील मौखिक साहित्य यामध्ये समूहाच्या भावनांचे, अनुभवाचे, ज्ञानाचे प्रकटीकरण झालेले दिसते. साहित्याचा सामाजिक, सांस्कृतिक बाजूने अभ्यास करताना मौखिक साहित्याचा उपयोग होतो.लोकसाहित्य हे शाब्द व शाब्देतर सामग्री अशा स्वरुपात दिसून येते.लोकसाहित्याचा अविष्कार गतिमान असून ते जुने ही नाही आणि नवे ही नाही ते अखंड प्रवाही असल्याचे दिसते. जीवन संदर्भ व परिसर संदर्भ नुसार बदलत राहतात. याचा करविता अनामिक असल्याने समुहमनाचा अविष्कार होतो. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तर्ध्रात मराठी लोकसाहित्याचे संकलनास काशिनाथ छत्रे,विष्णुशास्त्री चिपळूणकर, म.मो.कुंटे यांनी सुरुवात केली. परंतु विसाव्या शतकात अभ्यासाबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. यामध्ये वि. का. राजवाडे, सानेगुरुजी, काका कालेलकर, दुर्गा भागवत, तारा भवाळकर रा.चि. ढेरे, प्रभाकर मांडे, मधुकर वाकोडे यांनी लोकसाहित्याचा अभ्यासास वातावरण अनुकुअल बनवले. जागतिक लोकसाहित्य, भारतीय लोकसाहित्य व वाड्मयीन लोकसाहित्य असा अभ्यासास प्रारंभ झालेला दिसतो.
Keywords मौखिक, अनामिक, लोकानुभव, समूहमन, परंपरागतता, आदिम समूह.
Field Arts
Published In Volume 8, Issue 1, January-February 2026
Published On 2026-02-24

Share this