International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 2 (March-April 2026) Submit your research before last 3 days of April to publish your research paper in the issue of March-April.

अथर्ववेदातील औषधी वनस्पती आणि त्यांचे रोगानिवारणात्मकता: एक अभ्यास

Author(s) Dr. Manjushri Shripad Nevhal, Dr. Anand Ramu Sukenkar
Country India
Abstract या शोधनिबंधाच्या निमित्ताने अन्वेषणाचा केंद्रबिंदू म्हणजे – आयुर्वेदाच्या परंपरेत औषधी वनस्पतींचा शोध घेणे, त्या वनस्पतींचे स्वरूप व गुणधर्म समजून घेणे, तसेच कोणत्या व्याधींवर त्यांचा उपयोग प्राचीन काळी केला जात होता हे शोधणे. विशेषतः अथर्ववेदात वर्णन झालेल्या कुशा, अपामार्ग, दर्भ, अश्वत्थ, हरिद्रा, नीम, अर्जुन, पिंपळी, सुंठ, सोम इत्यादी वनस्पतींच्या उल्लेखांचा संदर्भ आधुनिक वैद्यकीय व आयुर्वेदीय दृष्टीने त्यांच्या औषधी उपयोगांचे अध्ययन करण्याची आवश्यकता आहे.
या संशोधनातून निदर्शनास येते अथर्ववेदातील औषधी वनस्पतीमध्ये प्रामुख्याने – ज्वर, कृमी, व्रण, स्त्रीरोग, हृदयरोग, कुष्ठ, मानसिक विकार अशा विविध व्याधींवर उपयुक्त असल्याचे वर्णन आढळते. आयुर्वेदाच्या द्रव्यगुणशास्त्र परंपरेशी तुलना केल्यास या वनस्पतींचे गुणधर्म आजही तितकेच प्रभावी असल्याचे लक्षात येते. आधुनिक संशोधनाच्या संदर्भात हरिद्रा (हळद) याचे प्रतिजैविक व दाहशामक गुणधर्म, नीमाचे जीवाणुनाशक गुण, अर्जुनाचे हृदयसंरक्षक इत्यादी औषधी वनस्पतींच्या गुणांचे महत्त्व अधोरेखित होते.
Keywords आयुर्वेद, अथर्ववेद, व्याधी, औषधी वनस्पती, चिकित्सा
Published In Volume 8, Issue 2, March-April 2026
Published On 2026-03-05
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2026.v08i02.69991

Share this