International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160   •   Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 5 (September-October 2026) Submit your research before last 3 days of October to publish your research paper in the issue of September-October.

ग्रामीण व शहरी भागातील युवतींच्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षा

Author(s) Boriwale Meenakshi Pandurangsa
Country India
Abstract विवाहासाठी जोडीदार निवड ही अत्यंत महत्वाची बाब आहे. प्रत्येकाला मनाप्रमाणे जोडीदार मिळावा असे वाटते, जोडीदाराची निवड करताना प्रत्येक युवतीच्या मनात आपल्या जोडीदाराविषयीची स्वप्ने रंगलेली असतात. यात आपला जोडीदार सुंदर, सुशिक्षीत, होतकरू, नैतीकता जपणारा, सामाजिक प्रतिष्ठा असलेला असावा असे प्रत्येकालाच वाटते, प्रस्तुत संशोधन हे किशोरवयीन युवतींच्या जोडीदाराच्या सौंदर्य विषयक अपेक्षा अभ्यासण्यासाठी आयोजीत करण्यात आले. सदरील अभ्यासासाठी नांदेड जिल्यातील ग्रामीण व शहरी भागातील 18 ते 25 वर्षे वयोगटातील विविध महाविदयालयातील 250 युवतींची यादृच्छिक नमूना निवड पध्दतीद्वारे नमुना म्हणून निवड केली गेली. यात संशोधनासाठी आवश्यक असणारी युवतींची व त्यांच्या कुटुंबाची प्राथमिक माहिती आणि जोडीदार निवडीच्या अपेक्षाची संबंधीत माहिती संशोधकाने स्वतःतयार केलेल्या प्रश्नावली द्वारे युवतीकडून संकलीत केली. संकलीत केलेल्या माहितीचे विश्लेषण सारणीमध्ये वारंवारता व टक्केवारी द्वारे सादर करण्यात आले. सदरील संशोधनातून युवतींनी जोडीदाराच्या व्यक्तीमत्व विकासास प्राधान्य दिले असून सौंदर्य म्हणून युवती जोडीदाराच्या रंगाला प्राधान्य देत नाहीत व त्यांना त्यांच्या पेक्षा देखणा जोडीदार नसावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या
Keywords जोडीदार निवड, व्यक्तीमत्व विकास, जोडीदाराचे सौंदर्य
Field Arts
Published In Volume 5, Issue 6, November-December 2023
Published On 2023-11-12
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2023.v05i06.8549

Share this