International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160   •   Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 5 (September-October 2026) Submit your research before last 3 days of October to publish your research paper in the issue of September-October.

चित्रकलेच्या क्षेत्रावर एआयचा प्रभाव

Author(s) Ms. PALLAVI SHRINIWAS PANDIT
Country India
Abstract गोषवारा : कलेच्या क्षेत्रात सध्या एका नवीन तंत्रज्ञानाने खळबळ माजविली आहे, हे नवीन तंत्रज्ञान म्हणजे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ज्याला ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’(AI) म्हटले जाते. ज्याज्यावेळी नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागतो किंवा अस्तित्वात असलेले तंत्रज्ञान अधिक विकसित पावते त्यात्यावेळी त्या शोधामुळे/विकासामुळे विविध क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामांसंदर्भात मत-मतांतरे, चर्चा, वाद -विवाद होणे अटळ असते. खरे तर AI चा आपल्या दैनंदिन जीवनात कधीच शिरकाव झाला आहे. फेसबुक किंवा तत्सम सामाजिक माध्यमांवर व ॲप्स मध्ये आपल्या आवडीवर व पूर्व शोधांच्या वारंवारितेवर आधारित परिणाम आपल्यासमोर मांडले जातात तेच मुळात AI मुळे.

आरोग्य, शेती, शिक्षण, कायदा, स्मार्ट शहरे आणि पायभूत सुविधा, वाहतूक नियोजन, हवामान, अर्थक्षेत्र, माहिती तंत्रज्ञान यांसारख्या जवळपास सर्वच क्षेत्रात AI मुळे अवाढव्य माहितीचे व्यवस्थित संकलन करून ती सहजतेने हाताळणे, अपेक्षित नियोजन करणे, उपलब्ध विदेच्या आधारावर भविष्यातील अंदाज बहुतांशी अचूकतेने वर्तवणे सहज शक्य झाले आहे. पण तरीही कलेच्या क्षेत्रात जेव्हा AI च्या उपयोगितेचा मुद्दा विचारात घेतला जातो तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. या शोध निबंधात चित्रकलेतील AI च्या उपयोगितेचा, उपयोगासंदर्भातील विविध प्रश्नांचा, मर्यादांचा व AI वापरताना उद्भवणाऱ्या नीतिमत्तेशी संबंधित प्रश्नांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे‌.
Keywords उकल शब्द : कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, चित्रकला, उपयोगिता, मर्यादा, नीतिमत्ता
Published In Volume 8, Issue 5, September-October 2026
Published On 2026-10-18
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2026.v08i05.90064

Share this